रोहित-विराट तयारीला लागा! T20 World Cup 2024 ची तारीख ठरली? उरले फक्त 9 सामने

T20 World Cup 2024 Timetable : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप कधी असेल? याचा उत्सुकता सर्वांनाच होती. अशातच वर्ल्ड कपची सुरूवात 3 जून रोजी होण्याची शक्यता आहे. तर शेवटचा सामना 30 जून रोजी होईल, अशी माहिती समोर आली आहे.

रोहित-विराट तयारीला लागा! T20 World Cup 2024 ची तारीख ठरली? उरले फक्त 9 सामने title=

T20 World Cup 2024

Indian Cricket Team : वनडे वर्ल्ड कप संपताच आता टी-ट्वेंटी वर्ल्ड कपची (T20 World Cup 2024) तयारी सुरू झाली आहे, जून महिन्यात टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचं रणशिंग फुंकलं (T20 World Cup 2024 Timetable) जाणार आहे. त्यामुळे वर्ल्ड कप सुरू होण्यास फारसा वेळ उरलेला नाही, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. टीम इंडियाकडे (Team India) वर्ल्ड कपपूर्वी तयारीसाठी फक्त 9 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने शिल्लक आहेत. त्यामुळे आता टीम इंडियासमोर कोणकोणती आव्हानं असणार आहेत? वर्ल्ड कप सुरू कधी होणार? याचं उत्तर पाहुया…

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टी-ट्वेंटी वर्ल्ड कपची सुरूवात येत्या 3 जून रोजी होण्याची (T20 World Cup 2024 Timetable) शक्यता आहे. तर शेवटचा सामना 30 जून रोजी होईल, अशी माहिती समोर आली आहे. याबाबत आयसीसीने अधिकृत घोषणा केली नाही. वनडे वर्ल्ड कपनंतर खेळाडूंना दिला जाणारा आराम आणि आयपीएल, यामुळे आता टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाकडे खुपच कमी वेळ शिल्लक आहे.

आगामी T20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियाकडे फक्त 8 सामने बाकी आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध रायपूर आणि बंगळुरू येथे आणखी दोन सामने खेळले जातील. त्यानंतर टीम इंडियाची दक्षिण आफ्रिकेविरुद्धची पुढील टी-20 मालिका दक्षिण आफ्रिकेच्याच मैदानावर खेळवली जाईल. यामध्ये टीम इंडिया 3 सामने खेळेल. तर त्यानंतर टीम इंडियाला अफगाणिस्तानविरुद्ध भारतातच 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. त्यानंतर आयपीएलचा थरार सुरू होईल.

कोण करणार टीम इंडियाचं नेतृत्व?

टीम इंडियाचे कर्णधार कोण होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही? रोहित आणि विराट खेळणार की नाही? यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. राहुल द्रविड यांच्या कामगिरीवर बीसीसीआय खुश असून त्यांच्यावर टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या प्रशिक्षणाची जबाबदारी दिली जाऊ शकते. तर रोहित शर्मावर बीसीसीआय पुन्हा विश्वास दाखवण्याची शक्यता आहे.

T20 World Cup पात्र असलेले संघ

वेस्ट इंडिज, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान.

दरम्यान, नेपाळ आणि ओमान यांनी 2024 च्या पुरुषांच्या T20 विश्वचषकात आपले स्थान निश्चित करण्यासाठी आयसीसीच्या आशिया पात्रता फेरीत आपापल्या सेमीफायनलमध्ये विजय मिळवला होता.

Leave a Comment